Breaking News

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाटण तालुका सरचिटणीसपदी सागर पाटील

कराड, दि. 23 (प्रतिनिधी) : आमदार नरेंद्र पाटील व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे कट्टर समर्थक सागर दिलीप पाटील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी  काँग्रेसच्या पाटण तालुका सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली. राज्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या हस्ते  त्यांना निवडी संबंधीचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सागर पाटील यांनी पाटण तालुक्यात गेल्या 10 वर्षापासून आपले सामाजिक कार्य चालू ठेवत पक्षाच्या वाढीसाठी व  बळकटीकरणाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. आमदार नरेंद्र पाटील व पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची  तालुक्यात ओळख आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नीशील राहणार असल्याचे सागर पाटील यांनी  आपल्या निवडीनंतर बोलताना, सांगितले. विद्याथ्यार्र्ंच्या विविध प्रश्‍नांसाठी सत्ताधार्‍यांशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची  ग्वाही देखील पाटील यांनी दिली.
त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, युवा नेते  सत्यजितसिंह पाटणकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हाअध्यक्ष अतुल शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण यादव, इंद्रजित पाटील, अनिल जाधव, महेश  सुर्यवंशी, शैलेश पुजारी, तानाजी भिसे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पाटण तालुक्यातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.