Breaking News

ल आचार्य आरबीआय चे नवे डेप्युटी गव्हर्नरविर

नवी दिल्ली, दि. 29 - विरल आचार्य यांची रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. विरल आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. विरल आचार्य यांची नियुक्ती ही तीन वर्षांसाठी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अपॉईंटमेंट कमिटीने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं.
नोटाबंदीनंतरच्या पन्नास दिवसात सातत्याने नवनवी परिपत्रके जारी करण्यामुळे टीकेचं लक्ष्य बनलेल्या रिझर्व बँकेवर त्यांची नियुक्ती अतिशय खडतर वेळी  झाल्याचं मानलं जातंय. विरल आचार्य यांनी 1995 साली आयआयटी पवई मधून बीटेक पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ  बिझिनेसमधून त्यांनी फायनान्समध्ये पीएचडी मिळवली. 2001 ते 2008 या काळात ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते. बँक ऑफ इंग्लंडमध्येही त्यांनी  रिसर्च फेलो म्हणून काम पाहिलंय.