शशीकला नटराजन एआयएडीएमकेच्या नव्या सरचिटणीस
चेन्नई, दि. 29 - शशिकला नटराजन यांची एआयएडीएमके पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके ची पहिली जनरल काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. चेन्नईत एआयएडीएमके पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी शशिकला यांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं.
जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके पक्षाची पहिली महत्त्वाची बैठक झाली. पक्षाचे सर्व मोठे नेते आणि जनरल काऊन्सिलचे सदस्य बैठकीत सहभागी होते. मधूसुदनन यांनी बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. तामिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांमधील एआयएडीएमके पक्षाच्या सचिवांनाही या बैठकीत बोलावण्यात आले होते. त्याचसोबत तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम, सर्व कॅबिनेट मंत्री, एम. थंबीदुरई आणि पक्षाचे आमदारही बैठकीला हजर होते. दरम्यान, पन्नीरसेल्वम यांनी काही दिवसांआधीच सरचिटणीसपदासाठी शशिकला यांच्या नावाची शिफारस केली होती. शशिकला जनरल काऊन्सिल बैठकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधून संदेश देण्याची शक्यता आहे.