Breaking News

बालवैज्ञानिकांच्या मेळाव्यातून उद्याच्या वैज्ञानीकांची निर्मिती ः आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 27 - तालुका स्तरावर बालवैज्ञनीकांचे मेळावे, उदयाचे भारतीय वैज्ञानीक तयार करण्याबरोबरच विद्यार्थांमध्ये छोटया छोटया प्रयोगाच्या माध्यमातून  वैज्ञानिक आवड निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा टप्पा असतात. आज मंगरूळ नवघरे येथे जवळपास 70 उच्च प्राथमीक शाळांनी व 50 चे वर माध्यमीक  शाळांनी सहभाग नोंदविल्याने या मेळाव्यात येणार्‍या विद्यार्थांमध्ये एक उच्च वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणार आहे. ही खरी या मेळाव्याची उपलब्धी होय असे उद्गार  आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली पंचायत समिती अंतर्गत आयोजित तालुका स्तरीय बालवैज्ञनीकांचे मेळावा उद्घाटन प्रसंगी बोलतांना काढले. या उद्घाटन  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकरराव धमक हे होते. तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे  सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, प.स.सभापती लक्ष्मणराव आंभोरे, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, माजी सदस्य समाधान सुपेकर, विजय शेजोळ, शिवनारायण  म्हस्के, भारत म्हस्के, किशोर सोळंकी, समाधान आकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
विज्ञान मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व गावकरी यांना मार्गदर्शन करतांना आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या विद्यार्थी  जिवनातील अनुभवाशी शिदोरी विद्यार्थांसमोर उघड केली. बाल वैज्ञनीकांच्या कल्पकतेचे कौतूक करतांना त्यांनी विद्यार्थांशी संवाद साधला, त्याला विद्यार्थीं व  बाल वैज्ञानीकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. या मेळाव्याचे अवलोकन करतांना आपल्या बुध्दीमत्तेचे प्रदर्शन करणारी उपकरणे व विद्यार्थी यांचे  त्यांनी मनमुरादपणे कौतुक केले.
या तालुका स्तरीय मेळाव्यात जवळपास 150 उपकरणे विद्यार्थांनी सादर केली होती. मंगरूळ नवघरे व परीसरातील शाळेतील विद्यार्थांनी या विज्ञान  प्रदर्शनीस अवर्जुन भेटी दिल्या. विज्ञान उपकरणाचे सादरीकरणा शिवाय या मेळाव्यात विद्यार्थांची प्रश्‍न मंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, व वत्कृत्व स्पर्धा घेण्यात  आल्या. त्यालाही विद्यार्थांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. या दोन दिवशीय मेळाव्यात उत्कृष्ठ साहित्य व घेण्यात आलेल्या स्पर्धा मधून उत्कृष्ठ स्पर्धकांना  स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपसभापती दयानंद खरात, सर्व पंचायत समिती सदस्य, पंचायत  समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मंगरूळ नवघरे सरपंच सौ. रंजनाताई शिंदे, उपसरपंच आंभोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक गटशिक्षणाधिकारी राजपुत व सुत्रसंचालन विस्तार अधिकारी जे.डी.काळे, तर आभार प्रदर्शन सौ. पांडे व विज्ञान संघटना  अध्यक्ष विजय भोयर व किशोर करणखर यांनी केले.
या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आमदार राहुल बोंद्रे यांनी दत्तक घेतलेली विदर्भातील एकमेव आय.एस.ओ. प्रमाणपत्र प्राप्त शाळा व महाराष्ट्रातील सर्वाधीक  शैक्षणीक क्षेत्रातील 105 उपक्रम राबवून नावलोकीक मिळविणारी जिल्हा परिषद मराठी पुर्व प्राथमीक शाळा वरखेडचे मुख्याध्यापक बंगाळे यांचा सत्कार आमदार  राहुल बोंद्रे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थिीतीत करण्यात आला. शैक्षणीक गुणवंतेत अग्रेसर आणी आपले सर्व उपक्रम लोकसहभागातून राबविणारी या शाळेचा  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे कार्यरत बुलडाणा जिल्हा नागरीक मंडळ यांचेकडूनही सत्कार करण्यात आला होता. शाळेच्या या  नाविन्यपुर्ण कामाची ही पावतीच, त्यामुळे शाळेच्या उपक्रमशिलतेची दखल या विज्ञान प्रदर्शनी दरम्यान घेण्यात आली.