Breaking News

जगातील सर्वात उंच पुल वाहतुकीसाठी खुला !

बीजिंग, दि. 31 - चीनमध्ये बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे नाव बेईपानजियांग असे असून याची उंची 565 मीटर (1 हजार 854 फुट) आहे. नदीवर बांधण्यात आलेला हा पूल युनान आणि गीझू या दोन प्रांतांना जोडतो. हा पूल बांधण्यासाठी एक अब्ज युआन पेक्षाही अधिक खर्च करण्यात आला आहे.
शुआनवेई आणि शुईचेंग यांदरम्यानचा प्रवास करण्यासाठी आता केवळ 1 तास लागणार आहे. यापूर्वी हाच प्रवास करण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागत होता.