न्यूझीलंडचा बांगलादेशला व्हाईटवॉश; 8 गडी राखून विजय
ऑकलंड, दि. 31 - तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आज न्यूझीलंडने बांगलादेशवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिका 3-0 ने जिंकली. कर्णधार केन विल्यमसन आणि नील ब्रूम यांच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तमीम इक्बाल (59) आणि इमरूल कयास (44) यांनी शतकी सलामी दिली. पण त्यानंतर बांगलादेशने ठराविक अंतराने गडी गमावले. नुरूल हसनच्या (44) प्रयत्नांमुळे बांगलादेशने 50 षटकांत 9 बाद 236 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मार्टीन गप्टील रिटायर्ड हर्ट झाला तर लॅथम 4 धावांवर बाद झाला. कर्णधार केन विल्यमसनच्या नाबाद 95 आणि नील ब्रूमच्या 97 धावांमुळे न्यूझीलंडने 42 व्या षटकात सामना जिंकला. विल्यमसनला सामनावीर घोषित करण्यात आले.