Breaking News

दारुबंदीसह स्वच्छतेच्या जागृतीसाठी मलकापुरात अवतरले संत गाडगे बाबा

कराड, दि. 23 (प्रतिनिधी) : श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्यावतीने संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबांच्या जीवनावरील नाटीकेचे मलकापूर येथील  शिवाजी चौकात सादरीकरण करण्यात आले. संत गाडगेबाबांनी जीवनभर स्वच्छता मोहिम व दारूबंदीची मोहिम राबविली होती. या नाटिकेच्या माध्यमातून प्रबोधन  करण्यात आले. 
मलकापूर, आगाशिवनगर, शास्त्रीनगरमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. विशेषत: परिसरात देशी-विदेशी दारूची दुकाने, परमीट रूम, बिअरबारचे प्रमाण वाढल्यामुळे  परिसरातील तरूण पिढी बरबाद होत चालली आहे. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व संलग्न विद्यालयांनी संत गाडगे  महाराजांच्या जीवनावरील दारूबंदी व स्वच्छता ही नाटिका सादर केली. यावेळी आदर्श ज्युनिअर कॉलेज ते बालवाडीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक, नगरपंचायतीचे  आजी-माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालक वसंतराव चव्हाण, प्राचार्य आर. आर. पाटील,  उपमुख्याध्यापक एस. वाय. गाडे, पर्यवेक्षक शिर्के व सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.