Breaking News

सुप्रिया जाधव शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची सुप्रिया विजय जाधव हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत  येण्याचा बहुमान मिळवला. सुप्रिया जाधव हिने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात 78 टक्के गुण मिळवित विद्यापिठात सहावा क्रमांक पटकविला.  या तिच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस, सहसंचालक प्रा. डॉ. बी. बी.  जैन, सहसंचालक (इंजि) प्रा. डॉ. अनिरुध्द महात्मे, प्राचार्य एस. आर. जाधव, रजिस्ट्रार गणेश सुरवसे, विभाग प्रमुख सुचिता कंडारकर आदींनी तिचे अभिनंदन  केले.