Breaking News

शिव स्मरकासाठी राजवाड्यावरील दगड-माती रवाना

बुलडाणा, दि. 23 - मुंबई येथे अरबी समुंद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपति शिवजी महाराज स्मारकाच्या पायाउभारणीसाठी माँ जिजाऊचे जन्मस्थान मातृतिर्थ  सिंदखेड राजा येथील राजवाड्या मधील दगड,माती आज मुंबई कडे शिवसंग्राम संघटना देऊळगांव राजा तालुका यांच्या वतीने नेण्यात आले. 24 डिसेंबर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व शिव स्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या उपस्थीत मा.पंतप्रधान नरेंद्र मोती यांच्या हस्ते जिजाऊ  जन्मस्थान तथा शिवजी महाराज यांचे मामकुळ सिंदखेड राजा येथील लखोजी राजे जाधव यांच्या राजवाड्यातील दगड,मातीने अभिषेक करुण पायाउभारणीने  अरबी समुंद्रतील शिवस्मारक उभारणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड व जिल्हा सरचिटणीस नितेश थिगळे यांच्या  मार्गदर्शनाखाली दे.राजा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे तसेच तालुका संघटक जाहिर खान पठाण यांनी आपल्या सहकार्यासमवेत माँ जिजाऊ जन्मस्थान मातृतिर्थ  सिंदखेड राजा येथील लखोजी राजे जाधव यांच्या राजवाड्यातील दगड माती संकलित करून  कलशामध्ये भरले व मुंबई कडे शिवस्मरकाच्या भूमि पूजनासाठी  रवाना करण्यात आले.यावेळी शिवभाऊ पुरंदरे,भगवान म्हस्के,प्रवीण लहाने,विशाल थिगळे,कैलास येवले यांच्या सह शिवसंग्राम संघटनेचे दे.राजा - सि.राजा  येथील कार्यकर्ते हजर होते.