Breaking News

रमाई व शबरी घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ!

बुलडाणा, दि. 29 - ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द कुटूंबाना हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना तसेच अनुसूचित जमातीतील  कुटूंबासाठी शबरी आवास योजने अंतर्गत देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करून प्रधान मंत्री आवास योजने मधील निधी व रमाई घरकुल योजनेतील निधी यातील  तफावत दुर करून पंतप्रधान आवास योजने प्रमाणेच लाभार्थ्यांना 1.36 लाख रूपये अनुदान देण्यात यावे. अशी आग्रही मागणी चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे  यांनी 16 डिसेंबर 2016 रोजी नागपुर अधिवेशनात औचित्याच्या मुद्याखाली चर्चेत सहभाग घेतांना केली होती. परिणामी राज्य शासनाने या आग्रही मागणीची  दखल घेत रमाई व शबरी घरकुल योजनेच्या साधारण क्षेत्रासाठी 1.32 लाख रूपये व डोंगराळ भागासाठी 1.42 लाख रूपये हया प्रमाणे प्रति घरकुल अनुदान  देण्याचा निर्णय मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी घेतला असुन तसे जाहीर करण्यात आले आहे.
     विधानसभेत औचित्याच्या मुद्याखाली उपस्थित चर्चेत सहभाग घेवून आमदार राहुल बोंद्रे यांनी राज्यात राबविल्या जाणार्‍या रमाई व शबरी घरकुल योजना  आणी पंतप्रधान आवास योजना या अंतर्गत देण्यात येणारे अनुदानामधील विसगती सभागृहाच्या लक्षात आणुन देत या दोन्ही योजनेमध्ये असलेली तफावत दुर  करून पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवरच राज्यात रमाई व शबरी घरकुल योजनेसाठी देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत  लाभार्थ्यांला मनरेघा अंतर्गत 16 हजार रूपयाचा लाभ दिल्या जातो. त्या प्रमाणे रमाई व शबरी घरकुल योजनेलाही मनरेघा अंतर्गतचा लाभ देण्यात यावा अशी  आग्रही मागणी सभागृहात केली होती. त्या मागणीचा राज्य मंत्रीमंडळाचे बैठकीत विचार करण्यात येवून रमाई व शबरी ग्रामणी भागसाठीचे लाभार्थ्यांना 1.32 लाख  रूपये व डोंगराळ भागासाठी 1.42 लाख रूपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला आहे. या अनुदाना अंतर्गत साधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांना 17280  तर डोंगराळ क्षेत्रातील लाभार्थ्यांना 18240 ऐवढे जास्तीचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बरोबरच प्रधानमंत्री आवास योजना शहरी यातही बदल  करण्यात आला असून लाभार्थ्यांंना घरकुल बांधकामासाठी 2.5 लाख रूपये ऐवढे अनुदान देण्यात येणार आहे.  ही ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द  कुटूंबाना रमाई व शबरी घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदान हे आमदार राहुल बोंद्रे यांचे प्रयतकने मिळालेली नववर्षाची भेट म्हणता येईल.