Breaking News

क्रांती दिनानिमित्त चंद्रप्रकाश देगलुरकरांचे व्याख्यान

बुलडाणा, दि. 29 -  जानेवारी भिमा-कोरेगाव क्रांतीदिना निमीत्त बुलडाणा जागरच्या वतीने 1 जानेवारी 2017 ला पत्रकार भवन येथे 12:30 वाजता  भिमा-कोरेगाव क्रांती दिन या विषयावर जेष्ठ साहित्यीक चंद्रप्रकास देगलुरकर यांचे जाहीर व्याख्यान व कार्यकारी अभियंता डी टी शिपणे हे प्रशासकीय सेवेतुन  कार्यमुक्त होत असल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.कार्यकारी अभियंता डी टी शिपणे यांनी सिंचन विभागात अतिशय अतुलनिय कामगीरी  केलेली असुन.अनेक शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करून जलयुक्त सिंचन शेती कसण्यास प्रोत्साहन करून शेतकरयांचे जिवनमान उंचविण्यासाठी मोठे कार्य केले  आहे तसेच जिल्ह्याभरात जलक्रांती केलेली आहे त्या मुळे शासन स्तरावर त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक झालेले आहे , त्यांच्या या कार्याचा सत्कार व्हावा या  उद्देशाने त्यांचा सत्कार आयोजन क्रांती दिनानिमीत्त ठेवण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ साहित्यीक चंद्रप्रकास देगलुरकर अप्पर पोलीस  अधिक्षक श्‍वेताताई खेडकर,  उपस्थित राहणार असुन अध्यक्षस्थानी एस पी हिवाळे राहाणार आहेत तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन समाधान चिंचोले बळी पवार यांनी केले आहे.