Breaking News

सातपुड्याच्या कुशीत ‘दिशा दाखविणारे बोट’ पुस्तकाचे प्रकाशन

बुलडाणा, दि. 29 - प्रा.डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या दिशा दाखवणारे बोट या पुस्तकाचे प्रकाशन सातपुड्याच्या कुशीत आदिवासी वस्तीत आदिवासी युवक,  महिला, गुराख्यांच्या हस्ते 25 डिसेंबरला झाला. या प्रकारे पुस्तक प्रकाशनाचा हा पहिलाच प्रयोग आहे,’असेे मत साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी या वेळी व्यक्त  केले. 
जळगाव तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीमध्ये वसलेले हनवतखेड हे गाव, संपुर्ण गावामध्ये एकच बिलाला नावाचा आदिवासी समाज, जातीचे प्रमाणपत्र  मिळत नसल्यामुळे विकासापासून कोस दूर अशी या समाजाची ओळख आहे. उपेक्षीत आदिवासी युवक युवतीच्या हातुन ह्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी  लेखिकेची अपेक्षा होती. त्यामुळे या प्रकारे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी लेखिका डॉ. विजया लक्ष्मी वानखेडे यांनी पुस्तक लिहिन्यामागील प्रेरणा हा उपेक्षीत समाजाचा नायक असून त्याने केलेला संघर्ष आपण या  पुस्तकात रेखाटत केल्याचे सांगितले. या नायकाचा संघर्ष या समाजासाठी प्रेरणादायी व्हावा, यासाठी आपण हे पुस्तक यांच्यासाठी अर्पण करीत असल्याचे त्यांनी  सांगितले. या सोबतच त्यांच्याच ती कविता आणि चळवळ ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन सुध्दा करण्यात आले. याप्रसंगी नरेंद्र लांजेवार, वर्‍हाडी कवी तुळशीराम  मापारी, लेखक सर्जेराव चव्हाण हे साहित्यिक उपस्थित होते.