पुण्यातील बेकरीत आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
पुणे, दि. 30 - पुण्यातील कोंढवा बुद्रुक इथल्या बेकरीत आग लागली. या आगीत बेकरीतील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीत आज पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली. बेकरीला बाहेरुन कुलुप असल्याने कामगार आतच अडकले. त्यामुळे आत झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.