उद्यापासून बुलडाणा शहरातील स्वच्छता अभियान बंद!
बुलडाणा, दि. 31 - बुलडाणा अर्बन सेफ्टी अॅन्ड सेक्युरिटी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले शहर स्वच्छता अभियान 1 जानेवारी 2017 पासुन बंद करण्यात येणार असुन नागरिकांनी या संदर्भात नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
बुलडाणा शहर स्वच्छतेसाठी बुलडाणा अर्बन सेफ्टी अॅन्ड सेक्युरिटी संस्थेच्या वतीने ऑक्टोंबर 2014 पासुन बुलडाणा शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कालावधीत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन शहरातील नाल्यांची सफाई, रस्त्यावरील कचरा गोळा करणे, अनेक वर्षापासुन तुंबलेल्या नाल्या मोकळ्या करणे, नागरिकांना घरातील कचरा टाकण्यासाठी ड्रमची (डस्टबीन) व्यवस्था करण्यात आली यासाठी घंटागाडी कचरा वाहुन नेण्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा आदि महत्वपुर्ण कामे गत दोन वर्षात करण्यात आली. दरम्यान वार्डात साचलेली घान, दुर्गंधीची माहिती देण्यासाठी अॅपची सुविधा व यासाठी स्वतंत्रपणे कॉलसेंटरची स्थापना, मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यकरणात भर घालण्याचा प्रयत्न देखिल स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आला. बुलडाणा अर्बन सेफ्टी ऑन्ड सेक्युरीटी संस्थेने शहर स्वच्छतेसाठी राबविलेल्या पाच स्टेप मॉडेलला शहरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान बुलडाणा शहरवासीयांसाठी सुरू असलेले स्वच्छता अभियान दि. 1 जानेवारी 2017 पासुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तहसिल कार्यालय समोरील शहर स्वच्छता अभियान कार्यालयातील कॉल सेंटर व 7720034712 हा कॉल सेंटर सुध्दा बंद करण्यात आला आहे. शहरात यापुर्वी कचरा उचलण्याच्या ज्या वेळा होत्या त्या सुध्दा रद्द करण्यात आल्या असुन नागरिकांच्या घराच्या आजुबाजुला व परिसरात बसविण्यात आलेल्या डस्टबीन मात्र 31 डिसेंबर 2016 सायंकाळ पर्यंत उपलब्ध राहतील असे स्पष्ट करून गत दोन वर्षात शहर स्वच्छता अभियान राबवितांना केलेल्या सहकार्याबद्दल बुलडाणा अर्बन सेफ्टी अॅन्ड सेक्युरिटी संस्थेने शहरवासियांचे आभार मानले असुन दि. 1 जानेवारी 2017 पासुन सदर स्वच्छता अभियान बंद होणार असल्याने याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.