आज भव्य बहूजन क्रांती मोर्चा
बुलडाणा, दि. 29 - राज्यासह देशभरात बहूजनांवर होत असलेल्या अन्यायाविरुध्द तसेच संविधानीक न्याय, हक्काच्या मागणीसाठी ‘एकच पर्व...बहूजन सर्व’च्या घोषणेखाली आज जिल्ह्यातील बहूजन बांधव जिल्हा मुख्यालयी दाखल होणार आहे. राज्यात नगर, गोंदीया, सिंधूदूर्ग, पनवेल, पुणे, कोल्हापूर, सोलापूर नंतर आता बुलडाणा येथे आज हा मोर्चा निघाणार आहे. कोपर्डी सारख्या अक्षम्य अपराध करणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, ओबीसी आरक्षणाला हात लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ निर्माण करावे, अल्पसंख्याक समुदायासाठी कम्युनल राईट्स प्रोटेक्शन अॅक्ट बनविण्यात यावा यासह इतर मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून स्थानिक गांधी भवन परिसरात दुपारी 2 वाजेदरम्यान हा मोर्चा निघेल तद्नंतर जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
स्थानिक जयस्तंभ चौक येथील गांधी भवन परिसरात आज 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी 10 वाजता सभेला प्रारंभ होणार असून यामध्ये एस.सी.,एस.टी., ओबीसी, मराठा आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्यांना घेवून संपूर्ण जिल्हाभरातून बहूसंख्य बहूजन बांधव या मोर्चातील सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. सदर मोर्चासाठी येणार्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, मोर्चेकर्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नियोजन समितीतील सदस्यांनी दिली आहे.
यावेळी गांधी भवन येथे आयोजीत सभेचे प्रास्ताविक प्रा.सदानंद माळी, संचलन कुणाल पैठणकर हे करणार आहेत. तर जिल्हा अ.लोहार समाज प्रकाश् सुरडकर, विदर्भ अ.भटक्या वि.जाती समाधान गुर्हाळकर, जि.अ.चर्मकार महासंघ प्रा.डि.आर.माळी, जि.अ.धनगर समाज कृ.स.मुरलीधर लांभाडे, जि.अ.जमेते उलेमा ए हिंद मूफ्ती अनिसोद्दीन साहेब, महाबोधी बुध्द विहार भन्ते स्वरानंद, लिंगायत धर्मगुरू संजय स्वामी सुखरामकर, महानुभाव पंथ लोणारकर बाबा, जैन समाज प्रतिनिधी जितेंद्र जैन, महाराष्ट्र नाभिक समाजाचे नेते दामोधर बिडवे, मुकनायक फाऊंडेशन सतिष पवार, कुंभार समाज संघटना के.ओ.बावस्कर, जि.अ.जिजाऊ ब्रिगेड वनिताताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता पी.जी.सवडतकर आदि मोर्चाला संबोधित करणार आहेत.