Breaking News

मनपा हद्दीत ट्रॅफिक सिग्नल तात्काळ सुरु करण्याचे महापौरांचे आदेश

। वाहतुक कोंडी रोखण्यासाठी महापौरांनी बैठक घेतली । मनसेच्या मागणीला यश 

अहमदनगर, दि. 31 - शहरातील व उपनगरातील ट्रॉफिक सिग्नल सुरु करणे संदर्भात आज महापौर सुरेखा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बेठक संपन्न झाली.  यावेळी त्यांनी प्रशासनास मनपा हद्दीतील ट्रॅफिक सिग्नल तात्काळ सुरु करण्यात यावे असे आदेश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, शहर अभियंता पी.एस.रजपूत, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख आ.जी.सातपुते, उद्यान अधिक्षक गोयल, एल अ‍ॅण्ड टी  कंपनीचे ईश्‍वर हांडे, किशोर वेकर, शहर वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यासंह नगरसेवक विक्रम राठोड, योगिराज ठाणगे, सुरेश तिवारी, वृषभ भंडारी आदि  उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाल्या की, शहरातून जाणार्‍या महामार्गावर प्रमुख चौकात ट्रॅफिक सिग्लन मनपा ने बसवलेले आहेत. नगर शहरातून शिर्डी, शिंगणापुर या  धार्मिक स्थळाकडे महाराष्ट्रातून व परराज्यातुन भाविक ये-जा करित असतात, परंतु काही सिग्नल बंद असल्याने चौकाचौकात वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण  होत आहे. या वाहतुक कोंडीने वाहन चालक , शाळेतील विद्यार्थी यांनी वारंवार सिग्नल दुरुस्ती करुन चालू करण्याची मागणी केलेली आहे. शहराची वाढती  लोकसंख्या पाहता सिग्नल दुरुस्ती करुन चालू करणे, टायमर बसवणे, बल्ब बसविणे आदि आवश्यक कामे करुन तातडीने सिग्नल चालु करण्यात यावेत आसे  आदेश दिले.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहणांची संख्य पाहता नागरीकांच्या सोईसाठी मनपा अधिकारी यांनी तातडीने या गोष्टीचा पाठपुरवा करुन लवकरात  लवकर सिग्नल सुरु करावे असे त्या म्हणाल्या.