भुजबळांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील अँजिओग्राफीला दमानियांचा विरोध
मुंबई, दि. 31 - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरंगात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल तक्रारीवर आता 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याशिवाय दमानिया यांनी भुजबळांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीसाठी केलेल्या विनंतीलाही विरोध केलाय.बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांना मोठ्या ऐशो-आरामात ठेवण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये भुजबळ हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसतात. एबीपी माझाने या व्हिडीओची पडताळणी केली नाही. छगन भुजबळ सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.