पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेज राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय
या स्पर्धेत पाहिल्याच वर्षी सुरु झालेल्या पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम या विषयात व्हायरोझोन या महत्वाच्या घटकावर पेपर सादर करित सबा सय्यद, अमित बोराटे, संजय सातपुते या विद्यार्थ्यांनी अटी-तटीच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रत्येक विद्यार्थ्यांला 1 हजार रु.रोख, ट्रॉफी, प्रशस्ती पत्रक देऊन पुणे येथे त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने अभिनंदन करुन सन्मानित केले.
संस्थेचे देवदत्त पाऊलबुद्धे यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पहिल्याच वर्षी कॉलेजने मिळविलेले हे यश प्रसंशनिय असल्याचे म्हटले. प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी मार्गदर्शक शिक्षिका चैताली दिवाने यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखाराणी खुराणा यांनी फार्मसी कॉलेजने पहिल्याच वर्षी मिळविलेले यश हे संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कॉलेजने अशीच प्रगतीची धोडदौड चालू ठेवावी अशा भावना कॉलेजच्या प्रा.रोशनी सुर्यवंशी, डॉ.विजय तारडे, प्रसाद घुगरकर यांनी व्यक्त केल्या.