जिल्हा सहकारी बँकेचा प्रत्येक गाव कॅशलेस करण्याचा निर्धार
। पिंपळगाव माळवीत अभियानाला चांगला प्रतिसाद
अहमदनगर, दि. 29 - भारतीय अर्थव्यवस्थेत चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद झाल्यानंतर कॅशलेस व्यवहारांना सर्वसामान्य जनता पसंती देत आहे. नाबार्डच्या सौजन्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आयोजित 30 दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सर्व व्यवहार कॅशलेस करण्याचा निर्धार व्यक्त केला. असून या अभियानाची सुरवात नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावातून करण्यात आली.नगर तालुक्यातील 25 गावे कॅशलेस करणार असल्याचे तालुका विकास अधिकारी साईनाथ दरेकर यांनी यावेळी सांगितले. पिंपळगाव माळवी येथे डिजिटल फायनाशियल लिटरसी कार्यक्रमातंर्गत शेतकरी, महिला, बँकेचे खातेदार यांना कॅशलेश व्यवहाराचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन व्यवहारात जनतेने रोख पैसे वापरण्याऐवजी चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅशलेस इकॉनॉमीचा स्विकार करावा. असे प्रात्याक्षिकाव्दारे बँकेच्या अधिकार्यांनी गावकर्यांना दाखविले. याप्रसंगी ए.टी.एम कार्डचे वाटप खातेदारांना करण्यात आले. संगणक प्रमुख अरुण सोले, तालुका नोडल प्रमुख रविंद्र गायकवाड, शाखाधिकारी केशव पाटील, वसुली अधिकारी संजय भुतकर, अरुण पंडित, भगत साहेब, संपत सोनवणे, रशीद शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.