Breaking News

वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहेःआ.संग्राम जगताप

अहमदनगर, दि. 29 - गेल्या 4-5 वर्षांपासून दुष्काळाची तीव्रता आपण सर्वांनीच पाहिली आहे. ग्रामीण भागाबरोबरच त्याची झळ सर्वांनाच बसली आहे. त्यामुळे  वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व सगळ्यांनाच पटले आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज झाली आहे. वाढते प्रदुषण आणि दुषित हवा यामुळे अनेक  आजारांची उत्पत्तीही होऊ लागली आहे. अनेक मोठ-मोठे देशही या हवेच्या प्रदुषाणामुळे त्रस्त झाले आहे. भारतातील अनेक महानगरात तर मास्क घालूनच बाहेर  पडवे लागत आहे. ही परिस्थिती आपल्या शहराची होवू नये अशी अपेक्षा असेल तर प्रत्येकाने वृक्षरोपणाचे महत्व जाणून वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपाद  आ.संग्राम जगताप यांनी केले.
राऊ युवा प्रतिष्ठान व सारसनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने परिसरात आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी  प्रतिष्ठानचे  अध्यक्ष अ‍ॅड.राहुल रासकर, ज्ञानदेव रासकर, सुरेश आंबेकर, दत्ता जाधव, नारायण इवळे, प्रकाश भागानगरे, बाबा गाडळकर, तात्या दरेकर, रामदास कानडे,  जालिंदर बोरुडे, मिलापचंद पटवा, उत्तम गागरे, संदिप ढाकणे, किसन चौधरी, रामभाऊ इवळे, रमेश इवळे, सतीश पुंड, महेश भणभणे आदि उपस्थित होते. पुढे  बोलताना आ.जगताप म्हणाले, राऊ प्रतिष्ठानच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, आजच्या उपक्रम हा सर्वांना दिशादर्शक असाच आहे.  त्यांच्या प्रत्येक उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. याप्रसंगी राऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल रासकर म्हणाले, आमच्या  प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य परिश्रम घेत असतात. आजपर्यंत प्रतिष्ठानच्यावतीने  थोर विभुतींच्या जयंती-पुण्यतिथी, अन्नदान, रक्तदान, नेत्रतपासणी असे विविध उपक्रम राबविले आहेत व यापुढेही अशाच पद्धतीने प्रतिष्ठानच्यावतीने काम केले  जाईल, असे सांगितले.यावेळी नेहरु युवा केंद्राच्यावतीने कॅशलेस कार्यप्रणाली याविषयी केंद्राचे समन्वयक बाबाजी गोडसे यांनी मार्गदर्शन केले. राऊ युवा  प्रतिष्ठानच्यावतीने आलेल्या प्रत्येकाला वृक्ष भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भणभणे यांनी केले तर आभार विशाल रासकर यांनी  मानले.कार्यक्रमास देशमुख, चंद्रकांत गोरे, नाना फुलसौंदर, बाबा करपे, अप्पा वाळके, भाऊसाहेब पांडूळे, हिराभाऊ धोंडे, पांडूरंग निमसे, अण्णा भदर, भंडारी,  गांधी, मुनोत, बबन घुले, विशाल रासकर, भुषण दळवी, अमृत रासकर, अ‍ॅड.महेश शिंदे, दिलीप रासकर, अंकुश वायभासे, प्रदिप ढाकणे, पांडूरंग डोंगरे, राम  पालवे, नितीन रासकर, सतीश फुलसौंदर, सुभाष गिते, संजय कानडे, जितू जाधव, नकुल कुटे, अ‍ॅड.पोपट बडे, अ‍ॅड.सागर सोनवणे, अ‍ॅड.वैभव मुनोत, अ‍ॅड.  प्रणव धर्माधिकारी आदिंसह ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.