सिने स्टाईलने बेकायदेशीर दारु जप्त
अहमदनगर, दि. 29 - राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र सुरुच असून, पोलिस पथकाने सोमवारी नगर ते नेवासा, नगर-औरंगाबाद असा सिने स्टाईलने पाठलाग करून बेकायेदशीर दारु विक्रीसाठी घेवून जाणारे वाहन पकडले. विशेष म्हणजे आलिशान कारमध्ये बेकायदेशीर दारुची वाहतूक करण्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला. यापूर्वीही पारनेरला कारमधून बेकायेदशीर दारु घेवून जाताना पकडली होती. वांबोरी फाट्यावर कारसह बेकायदेशीर दारु असा एकूण 8 लाख 26 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
आहे. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.बी.लगड, एस.आर.कुसळे, व्ही.बी.कंठाळे, एस.आर.वाघ, चत्तर, प्रसाद चव्हाण यांनी ही कामगिरी केली.
आहे. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.बी.लगड, एस.आर.कुसळे, व्ही.बी.कंठाळे, एस.आर.वाघ, चत्तर, प्रसाद चव्हाण यांनी ही कामगिरी केली.