Breaking News

दि प्रोग्रेसिव्ह एज्यु.सोसा.चे स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनाने साजरे

अहमदनगर, दि. 31 - दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे सरस्वती पुजन व दिपप्रज्वलनाने  महापौर सौ.सुरेखाताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर श्रीपाद छिंदम, सुदर्शन न्यूज समन्वयक(दिल्ली)चे सचिन राऊत, संस्थेचे अध्यक्ष  पुरुषोत्तम कुलकर्णी, सेक्रेटरी अ.ना.मुळे, सह.सेक्रेटरी सुनिल रुणवाल, मुख्याध्यापिका सौ.सुनंदा धिमते, प्राचार्य सुनिल पंडित, संस्थेच्या संचालिका विजया रेखे  आदि मान्यवर उपस्थित होते. टिळकरोडवरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय येथे आयोजित या स्नेहसंमेलनाप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राऊत यांनी भारतातील संपूर्ण खेड्यातून, शहरातून, शाळा व महाविद्यालयातून  उद्याचा भारत घडत आहे. समृद्ध व प्रगत होण्यासाठी आपल्या  देशाचा नागरिक हा शरीराने व मननाही सुदृढ असला पाहिजे, असा नागरिक तयार करण्याचे कार्य विविध शैक्षणिक संस्था व शिक्षकवृंद यांच्या माध्यमातून होत  आहे. ही कौतुकास्पद बाब असून, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बालचमुंनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पारितोषिके पटकावून मिळविलेले यश  निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असाच त्यांचा हा यशाचा आलेख पुढे चालू राहील, यासाठी सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी याप्रसंगी दिले. महापौर  सुरेखा कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थींनीना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचे कौतुक केले  व शाळेच्या पुढील कार्यासाठी सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी बोलताना शाळेच्या प्रगती विषयी सविस्तर आहवाल सादर केला. व सामाजिक, जाणिवेचे भान ठेवून यंदाच्या  वर्षी शाळेने मुली वाचवा, योगशास्त्राचे महत्व, नोटा बंदी, रयतेचा राजा, बाल शिवाजी अशा कार्यक्रमातून जनजागृती करण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याचे  सांगितले.
प्रास्तविक संस्थेचे सेक्रेटरी अ.ना.मुळे यांनी केले. सह सेक्रेटरी सुनिल रुणवाल यांनी उपस्थित मान्यवरांचा सविस्तर परिचय करुन दिला. संस्थेच्या  संचालिका विजया रेखे, मुख्याध्यापिका सौ.सुनंदा धिमते, प्रा.सुनिल पंडित, सौ.तारा रासकर यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक  केले. सौ.तारा रासकर यांनी आभार मानले.