रोखरहीत प्रदानाबाबत प्रशिक्षण संपन्न
बुलडाणा, दि. 31 - प्रशिक्षणामध्ये दिलेल्या सुचना हया प्रशिक्षणार्थी यांनी अंमलात आणुन त्याचा प्रचार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी मिनाक्षी पवार यांनी केले. 29 डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे रोखरहीत प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या यावेळी खाते प्रमुख, बँकेचे व्यवस्थापनक उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये जिल्हा कोषागार बँक ऑफ इंडीयाचे प्रतिनिधी तुषार देसले व अक्षय यांनी तपशीलवार प्रशिक्षण दिले. डिजीटल पेमेंट प्रशिक्षणामध्ये सर्व प्रकारचे प्रदानाच्या पध्दती ई बँकींग, डेबीट कार्ड/क्रेडीट कार्डव्दारे प्रदान, मोबाईल वॅल्टे,आधार लिंक, पॉईंट ऑफ सेल मशीन यंत्राच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटचे प्रकाराबाबत मार्गदर्शन प्रात्य क्षिकासह सादर करण्यात आले.