Breaking News

पाथर्डीत‘एक ओंजळ धान्य’ निराधारासाठी उपक्रम

अहमदनगर, दि. 27 - अनाथ,निराधार,वृद्ध, रस्त्यावर पालात राहाणारे कुटुंब पदपथावर रहाणारे निराश्रित अशा व ज्यांना दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे अशा  लोकांसाठी सेवक सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी निराधाराचा आधार बनत  एक ओंजळ धान्य निराधारासाठी  असा उपक्रम शाळा पातळीवर हाती घेतला त्या  उपक्रमाला विधार्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला .शंभर क्विंटल धान्य संकलीत करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी पाहिल्या टप्प्यात केला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले सेवक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते स्वतः आर्थिक प्रतिकुलतेतुन संघर्ष करताना पुढे आले आहेत नवीन वर्षात सकारात्मक व  विधायक कामाचा उपक्रम म्हणुन एक ओंजळ धान्य आनाथासाठी असा उपक्रम हाती घेत कार्यकर्ते कामाला लागले गेल्या चार वर्षापासुन समाजातील वंचीत  घटकासाठी वेगळ्या वाटेने जाउन काम करताना समाजातील सर्व घटकाकडून सक्रीय योगदान मिळविण्यात कार्यकर्त्यांना यश लाभले . गेल्या जुन महिन्यात  तालुक्यातील 150 अनाथ व निराधार मुलांना वहया पुस्तक व दप्तरांचे वाटप करण्यात आले दिवाळी सणांचा आनंद द्वीगुणित होवा रस्त्यावरच जिवन असलेल्या  लोकांचे सुध्दा तोंड गोड करावे या उद्देशाने कार्यकर्त्यांनी जिल्यातील सुमारे साडे तीनशे निराधरांना शोधुन कपडे व मिठाई चे वाटप केले नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला  जिल्हयातील प्रमुख शाळामध्ये जाउन कार्यकर्ते विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देतात जशा शिक्षक, विधार्थी , संस्थाचालक अदींशी संवाद साधून उपक्रमाची माहिती  देतात . दैनंदिन जगण्याशी सबंधीत विचारधारा विद्यार्थ्यांना अर्कर्षित करते आपली भुख भगली, भुकेलेल्याच्या भुकेचे स्मरण ठेवत काम करण्याने हातुन कधीही  वाईट कृत्य घडणार नाही आपणच आपल्या आयुष्याला चांगल्या वळणाकडे नेउ शकतो एक ओंजळ भर धान्य एकाची भुक भागवते हे समाधान अनुभवातुन  अनुभवा . अशा पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रेरित करून विधायक कार्यात सहभागी करून घेतले जाते श्रीतिलोक जैन विदयालयातील विद्यार्थ्यानी सुमारे 16 गोण्या  धान्य संकलीत करून दिले प्रत्येक विधार्थ्यांनी  घरातुन येताना ओंजळ भर धान्य आणले . गहु, ज्वारी, बाजरी असे धान्य गोळा झालेच पण घरात एक वेळी धान्य  न मिळाल्याने एका विद्यार्थाने  ओंजळ भर पीठ तर एका विद्यार्थीनीने ओंजळ भर मटकी आणली .विधार्थ्यांची ही भावना पाहाता उपस्थितांचे डोळे पाणावले. या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव सतीश गुगळे, प्राचार्य बबन फुंदे , संतोष चोरडिया, श्रीकांत काळोखे आदींसह सर्व शिक्षक उपस्थीत होते सेवक  सामाजीक संस्थेचे संस्थापक अमोल राठोड , उपाध्यक्ष अमृता दरंदले , भिमराज पवार, संदिप राठोड, सतीष मासाळकर , अदि कार्यकर्ते या उपक्रमासाठी परिश्रम  घेत आहेत . या बाबत माहिती देतांना राठोड म्हणाले पाथर्डी तालुक्यात ओंजळ भर धान्य उपक्रमाला प्रारंभ केला आहे श्रीतिलोक जैन विदयालय , स्वामी  विवेकानंद विदयालय ,वसंतदादा विदयालय या शाळामधुन घेतलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे नगर शहरासाठी स्वंतत्र  कार्यक्रम घेण्याचे नियोजन  आहे .पाथर्डी तालुक्यातील अंबेवाडी तांडा येथे दोन वेळा जेवणाची सोय नसलेल्या  वृद्ध दाम्पत्याला वर्षभर पुरेल एवढे धान्य दिले .आम्ही स्वतः ही अशाच  परिस्थीतुन पुढे आलो . चांगल्या कामाला लोकसहभाग महत्वाचा असुन लोकांच्या मनात विश्‍वास निर्माण झाला की कोणतेही काम सहज पार पाडता येते आमचे  स्वप्न आहे की जिल्यातील खर्‍या अर्थाने निराधार , निराश्रित , वृद्ध व गरजू माणुस उपाशी पोटी राहू नये यासाठी जिल्हाभर समविचारी कार्यकर्ते जोडत आहोत  नववर्षाच्या संकल्प सिद्धीस जाईल असा विश्‍वास वाटतो या सामाजिक कार्यात सह्भागी होउ इच्छीणार्‍यांनी 9604863031 या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा असे  आवाहन राठोड यांनी केले आहे.