Breaking News

महात्मा फुले नूतन महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सपंन्न

अहमदनगर, दि. 27 - मिरजगांव   येथिल महात्मा फुले नूतन महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या विद्यमाने नागलवाडी (ता. कर्जत) येथे  राष्ट्रीय  सेवा योजनेचे विषेश हिवाळी शिबिर दि.14 डिसेंबर तेे 20 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाले. या निवासी  शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा  योजनेतील स्वयंसेवकांनी नागलवाडी गांवात ग्रामस्वच्छता, गावातील रस्त्यावर मुरूम टाकुन रस्ते दुरूस्ती केले. तसेच अंगणवाडी, प्रथमिक शाळा व माध्यमिक  विद्यालयात स्वच्छता करून पाण्याचे महत्व सांगत महीला सक्षमीकरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा सारखे उपक्रम राबवत प्रबोधन पर कार्यक्रम केले. तसेच या  भागात वृक्षारोपन केेले. त्याच बरोबर मंदीर परीसर स्वच्छता , हागनदारी मुक्त गांव करण्यासाठीचे गांवकर्‍यांना मार्गदर्शन या योजनेतील स्वयंमसेवकांनी केले.  जनजागृती सारखे उपक्रम राबवले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंमसेवकांनाही शिक्षणाबरोबरच समाजातील सामाजिक बांधिलकीचे धडे देण्यात आले. मनापासुन रूग्णसेवा कशी करावी , ध्यान  धारणा प्रशिक्षण, युवकांच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान कसे असते. त्याच बरोबर संभाषण कौशल्य व सामाजिक सुसंवााद कसा साधावा याचे  मार्गदर्शन तसेच सेवा कार्याची नवी दिशा ठरवण्यासाठी या सारख्या कार्यक्रमांची गरज आहे. सेवा योजनेतील सहभागी विदयार्थ्यांनी नागलवाडी येथिल ग्रामस्थाची  रात्रीच्या वेळी करमणूक करण्यासाठी सांस्कृतीक  कार्यक्रम घेवुन नाटीकांमधुन प्रबोधन करत आंधश्रध्दा दुर करण्याचे अवाहन केले. या सेवा योजनेतील विदयार्थी  व विदयार्थ्यीनींना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तानाजी जाधव व त्यांचे सहकारी प्रा.हनुमंत खिळे, प्रा. संतोश राऊत, प्रा.कु.पुष्पा गांगार्डे यांचे  मार्गदर्शन लाभले तर नागलवाडीचे सरपंच अशोक डाडर, उपसरपंच वर्षा कापरे, माजी सरपंच डॉ.विलास कवळे, व सर्व ग्रा. प. सदस्य, कापरे भाऊसाहेब, सागर  बांदल, स्वप्नील कवळे, सह स्थानिक ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.