Breaking News

12 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

अहमदनगर, दि. 27 - शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने शनीशिंगणापुर येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन प्रा.डॉ.अशोकराव  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले. संमेलनात लोक साहित्य जागर यात्रा, ग्रंथ दिंडी, उद्घाटन, परिसंवाद, व्याख्यान, कवी संमेलन, कथा कथन,  प्रकट मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण व समारोप समारंभ असे साहित्यिक कार्यक्रम पार पडले. 
शनिवारी येथील कांगोणी कॉर्नर पासून लोक साहित्य जागर यात्रा व ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. संमेलनाध्यक्षा प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, स्वागताध्यक्ष प्रा.गणपतराव  चव्हाण, ज्ञानदेव पाडुंळे, अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे, संस्थापक सुनिल गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, शाहिर भारत गाडेकर, चंद्रकांत पालवे, एस.बी.शेटे, डॉ.दिगंबर  सोनवणे, भगवान राऊत, डॉ.राधाकृष्ण जोशी, अजयकुमार पवार, भाऊसाहेब सावंत, डॉ.राजेंद्र फंड, राजेंद्र पवार, बबनराव गिरी, रामदास सोनवणे आदींसह  शनैश्‍वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी, वारकरी, कलशधारी भगिणी, बहुरुपी, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे, भालदार चोपदारांच्या  वेषातील कलावंत, टाळ मृंदग, डफ अशा पारंपारीक वाद्यासह वादक, साहित्यिक, कवी, साहित्य रसिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिला बचत गट चळवळीच्या मार्गदर्शक सुनिता गडाख, संमेलनाध्यक्ष डॉ.अशोकराव शिंदे, शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा अनिता शेटे, जेष्ठ कवयित्री  डॉ.क्रांतीकला अनभुले, जेष्ट विनोदी लेखक नामदेवराव देसाई, देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या संमेलनाचे  उद्घाटन झाले. जेष्ठ लेखक देवदत्त हुसळे व जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. उद्घटनानंतर  ह.भ.प. उद्धव महाराज मंडलीक यांनी ‘माणसांच्या आयुष्यात  अध्यात्म आणि विज्ञानाची गरज’ या विषयावर तर डॉ.संजय कळमकर यांनी ‘स्वामी विवेकानंद  आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॉ.गनी पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊसाहेब सावंत यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  केले.  शाहिर भारत गाडेकर , शाहिर शेषराव पठाडे, प्रबोधनकार दिंगबर गोंधळी, सुनिल गोंधळी, सखुबाई खिलारी, अवंतिकाबाई खंडागळे आणि त्यांच्या  सहकार्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी खलील मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कवी संमेलनात प्रा.अल्लाउद्दीन सय्यद, चंद्रकला आरगडे, भास्करदादा लगड, गिताराम नरवडे, एस.बी.शेटे, शर्मिला गोसावी, ऋता ठाकुर, संगिता  आरबुणे, साहिल शेख, अरविंद शेलार, मारुती सावंत, मनिषा गायकवाड, जयश्री झरेकर, संजय बोरुडे, रा.चि.जंगले, शब्बीर मुलानी, सुभाष सोनवणे, विष्णु  सुरोसे, स्वाती पाटील, कार्तिकी नांगरे, विलास हडवळे यांनी आपल्या कविता सादर केल्या. संदिप काळे, संगिता फासाटे, व चंद्रकांत पोतदार यांनी या कवी  संमेलनाचे सुत्रसंचालन केले. जेष्ठ कवी लहु कानडे, चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘ लेखक आपल्या भेटीला’ या  कार्यक्रमात भगवान राऊत व जयश्री झरेकर यांनी त्यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या. प्रा. शर्मिला गोसावी यांनी लेखकांचा परिचय करुन दिला.