Breaking News

पळवलेली 24 लाखाची रक्कम नाशिक पोलिसांकडून जप्त

नाशिक, दि. 28 - मित्राची 23 लाख 85 हजार रूपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी मध्य प्रदेशातूनन जेरबंद  केले. त्याच्याकडून शंभर टक्के रक्कमेची वसूल केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, दत्ता कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  त्यांनी सांगितले की, मुकेश चंदुलाल जैन (परिमल सोसा. होलाराम कॉलनी) असे पैसे घेऊन पळून  कीजाणार्या मित्राचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसानी  मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील वर्ला तालुक्यात दडून बसलेल्या जैनला काही दिवसांपूर्वी शिताफीने अटक केली. 15 डिसेंबरपासून पोलीस जैनच्या  मागावर होते. या प्रकरणी परदेस दिपक देवनानी (25, रा. सुरूची अर्पाट. आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूररोड) या व्यावसायिकाने तक्रार दिली होती.
कंपनीला 25 लाख रूपयांचा भरणा करणे आवश्यक असल्याने देवनानीने संशयित आरोपीकडे 1 लाख 25 हजार रूपयांची मागणी केली होती. संशयित आरोपी  जैनने पैसे घेण्यासाठी देवनानीला होलाराम कॉलनी येथील घरी बोलवले. यावेळी देवनानीकडे पैशांची बँग होती. बोलण्यात गुंतवून ठवेत संशयिताने पैशांनी  भरलेली बँग घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  पोलीस निरीक्षक डॉ. सितराम कोल्हे पोलिस निरीक्षक सुनिल रोहकले, सहायक पोलिस निरीक्षक शेगर, पीएसआय उबाळे यांनी मध्य प्रदेश गाठून जैनच्या  मुसक्या आवळल्या.संशयित आरोपी रेती व्यावसायिक असून, मागील चार वर्षांपासून शहरात वास्तव्यास होता.
जैनने होलाराम कॉलनी परिसरातील एक इमारतीत भाड्याने घर घेतले होते. जैनविरोधात या पूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नसून, घर भाड्याने घेताना त्याने काही  कागदपत्रे घरमालकाकडे दिली होती. याच कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी जैनला हुडकून काढले. पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर,  संशयित जैनने पाच लाख रूपये देतो असे सांगत फिर्यादीस फिर्याद मागे घेण्यास सांगितले. मात्र, तपासादरम्यान, संपूर्ण पैसे परत मिळण्याचीअपेक्षा असलेल्या  पोलिसांनी फिर्यादीस पर्रावृत्त केले. व अखेरी संपुर्ण रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले. लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम सबंधीताना परत करण्यात  येणार असल्याचे यावेळी अधिकार्यांनी सांगितले.