मराठा समाजाची 1 जानेवारीला चिपळूणमध्ये सभा
रत्नागिरी, दि. 28 - जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे 1 जानेवारीस बैठक होणार आहे. चिपळुणातील अतिथी सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीत मराठा मोर्चासाठी संकलित केलेल्या निधीचा हिशेब सादर केला जाणार आहे. तसेच आगामी काळात समाजाची दिशा ठरविण्यावरही चर्चा केली जाणार आहे.
सकल मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी चिपळुणात 16 ऑक्टोबरला लाखोंचा मूक मोर्चा काढला होता. त्यासाठी जिल्ह्यातील समाजबांधवांनी आपल्या परीने अर्थसाह्य केले होते. नागपुरातील मोर्चाच्या पार्श्वजभूमीवर चिपळूणच्या प्रांत कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. याव्यतिरिक्त समाजाची बैठक झालेली नव्हती. दरम्यान नववर्षाच्या सुरवातीस होणार्याय या बैठकीत मोर्चासाठीचा हिशेब सादर केला जाणार आहे. मोर्चानंतर आगामी काळात समाज एकसंघ राहण्यासाठी बैठकीत चर्चा केली जाणार आहे. समाजाची जिल्हा कार्यकारिणीही बैठकीस उपस्थित राहणार आहे. समाज बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.