चंद्रकांत घाडगेनां जि.प.आदर्श गोपालक पुरस्कार
अहमदनगर, दि. 23 - श्रीगोंदा तालुक्यातील वागदंरी येथील रहिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुन चंद्रकांत मोहन घाडगे व पत्नी सिमा यांना यंदाचा 2016-17 चा जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार मिळाला आहे जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दि.19रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तेव्हा हाताला काम नाही कमी शिक्षण असल्याने नोकरी मिळेना म्हणून घरी दुध व्यवसाय करुन कुटुंब जगविण्यासाठी दोन म्हशी घेऊन काम सुरु केले आणि त्यातच यशाचा आत्मविश्वास वाढ आणि दारात एकूण साठ म्हशी घेऊन गेली दहा वर्षापासुन दुध धंदा करताना ग्राहकांना चांगले दर्जेदार दुध पिशवी पकिग करुन देऊ लागले. चार एकर जमिन तरी खर्च वाढला आणि बाजारपेठेतील अंदाज घेऊन मित्रांच्या सहकार्याने घरीच दुधापासुन दुध पिशवीसह श्रीखंड.आम्रखंड.तुप.खवा.दही.यासारखे पदार्थ बनवून ग्राहकांना घरपोहच देऊ लागलो म्हणून त्यातुनच सुमारे अडीशे लिटर दुध वाढले ग्राहक मिळाले आणि यशाचे शिखर गाठून जीवनाला दिशा मिळाली हे करीत असताना नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेद्र नागवडे पंचायत समिती सदस्या अनुराधा नागवडे यांनी माझ्या कष्टाची दखल घेऊन जिल्हा परिषदेकडे पुस्काराची शिफारस केली आणि प्रत्यक्ष अधिकार्यांनी येऊन पाहणी करुन खात्री करुन मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुशा गुंड पशुसंधनचे सभापती शरद नवले यांच्या हस्ते आदर्श गोपालन पुरस्कार मिळाला आहे माझ्या यशात पत्नी सिमाचा सिंहाचा वाटा आहे असे घाडगे म्हणाले .पुरस्कार मिळाल्याने राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे.राजेद्र नागवडे.प्रगतशिल शेतकरी संतोष पानसरे.डा.उंडे डा.पंधरकर.यांनी अभिनंदन केले आहे .