Breaking News

कॅशलेस बद्दल गैरसमज पसरवणे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन

अहमदनगर, दि. 23 - कशलेसबद्दल गैरसमज पसरवणे म्हणजे भष्ट्राचाराला प्रोत्साहन देणे कॅशलेस होणे ही काळाची गरज बनले आहे, असे मनोगत स्टेेट बँक  ऑफ इंडीया अहमदनगरच्या वरिष्ठ  अधिकारी स्नेहल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 
ग्राहकांत कोणी चुकीचे गैरसमज पसरवत असतील तर कायदेशीर कारवाईस पाञ राहु शकतात. नोटाबंदी नंतर ग्राहकांना येणार्‍या अडचणी व ग्राहकांमधील  व्यवहारांमधील गैरसमज दुर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल  बँक ऑफ इंडिया व  ग्रुप ग्रामपंचायत निघोज, दारुबंदी कृती समिती निघोज, निघोज  परिसर कृषी फलोद्यान  यांच्या संयुक्त विदयमाने  प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी कुलकर्णी बोलत होते. बँकेच्या अधिकार्‍यांशी संंपर्कात राहुन सर्व  उदयोजकांनी स्वाईप मशीन, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना रोख रक्कम देवुन आपल्या खात्याला सव्हिस चार्ज जमा होवु शकतात, असे सांगितले.
यावेळी निघोज शाखाधिकारी अभिजीत साखरकर यांनी ही बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यवहार कँशलेस करावेत. सर्व योजनांचा फायदा घ्यावा असे  आवाहन केले. सेंन्ट्ल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी अनु डनियल म्हणाल्या  की, नोटाबंदीमुळे सगळ्यांनाच दैनंदिन व्यवहारात अडचणी येतात. यावर  सर्वौत्तम मार्ग म्हणजे कॅशलेस पध्दतीचा जास्तीत जास्त अवलंब .यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कृषी वित्त अधिकारी अनिता माने, म्हणाले  शेतकर्‍यांसाठी खते औषधे व लहान मोठे  व्यवहार बँकेत न जाता कमीवेळेत पुर्ण होतील.कार्यक्रमासाठी सरपंच ठकाराम लंके , उपसरपंच बाबाजी लंके , निघोज  परिसर फलोद्यान ते चेअरमन मा. सरपंच चंद्रकांत लामखडे, व्हा.चेअरमन अमृताजी रसाळ, दारुबंदी चळवळीचे प्रणेते बबनराव कवाद, डॉ. महेंद्रजी झावरे,  संचालक वसंतराव कवाद, दत्ताजी भुकन, मोहनराव कवाद, गणेश कटारिया, सुनिल वराळ, ज्ञानेश्‍वर लंके, रोहिदास लामखडे, अनिल शेटे यांनी  निघोज कॅशलेस  होण्यासाठी व्यावसायिक, शेतकरी वर्ग व ग्राहकांना अडचणी येवु नये व जागरुकता व्हावे  म्हणुन पहिले पाऊल उचलले आहे. यामध्ये स्वाईप मशिन, डेबिट कार्ड,  क्रेडीट कार्ड यांच्या वापरा संदर्भात मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमासाठी सुनिती ज्वेलर्स, पुष्कर ज्वेलर्स, मळगंगा ज्वेलर्स, दुध व्यावसायिक, खते औषधे दुकानदार,  शेतकरी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वसंतराव कवाद, राजेंद्र लाळगे, सलीमभाई, विलास हारदे, निळकंठ सोनवणे, भास्कर कवाद,  भगवान मंदिलकर यांनी आपले प्रश्‍न विचारले. यावेळी विचारलेल्या प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचालन रामदास वरखडे यांनी केले तर  सर्वांचे आभार बबनराव कवाद यांनी मानले.