पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल!
मुंबई, दि. 23 - मुंबईतील 26 जुलैच्या महाप्रलयाच्या वेदनादायी आठवणींची सल मनात ठेवणार्या मुंबईच्या उंबरठ्यावर आणखी एक मोठं संकट येऊन उभं राहतंय. हे संकट सरळसोट मुंबईवर आक्रमण करणार नाही, तर कसलाही आवाज न करता, कुठलीही कल्पना न देता मुंबापुरीला आपल्या बाहूपाशात ओढणारं आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल. मुंबईतील वातावरण बदलावर झालेल्या एका रिसर्चमध्ये ही महाभयंकर भीती वर्तवली गेली आहे.
मुंबईच्याच मानगुटीवर बसलेलं हे संकट नाही तर गेली काही वर्ष सातत्याने जगात समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. जर समुद्राच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहीली तर सुमारे 40 टक्के मुंबई पुढील 100 वर्षात पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली गेली आहे. भुवनेश्वरमध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीतर्फे ट्रॉपमेट हे राष्ट्रीय चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात एका शोधनिबंधावर चर्चा झाली. त्यात या धोक्याची जाणीव करुन देण्यात आली आहे. हवामान बदलाचे मुंबईवर होणारे परिणाम या विषयासंदर्भातला हा शोधनिबंध होता.
मुंबईच्या 458.53 चौरस किलोमीटरपैकी 190 चौरस किलोमीटर क्षेत्राला शंभर वर्षांत जलसमाधी मिळू शकते, अशी भीती या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे. समुद्र दरवर्षी तीन मिलीमीटर मुंबईच्या किनारपट्टीकडे सरकतोय, असं निरीक्षणही त्यात नोंदवलंय. समुद्राची पातळी वाढण्याची प्रक्रिया जागतिक आणि स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळे होत आहे. समुद्रजलाची खोली, पातळी आणि तापमान, क्षारता, घनता बदलल्यामुळे प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश अस्तंगत होण्याचा धोकाही वाढेल.
भविष्यातल्या समुद्रपातळीच्या वाढीच्या संदर्भात विकासकामे, वस्त्या यांचं फेरनियोजन करणं आता आवश्यक आहे. यासाठी माणसाने समुद्राच्या म्हणजेच किनारी भागातल्या पर्यावरणात चालवलेली ढवळाढवळ कमी करणं आणि हवेचं प्रदूषण कमी करणं हा दुसरा उपाय आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे शास्त्रज्ञ आर. मनी मुरली यांनी रियास एमजे, रेशमा केएन आणि संतोष कुमार यांच्या सहकार्याने हा शोधनिबंध तयार केला आहे. यातील निष्कर्ष खूप महत्त्वाचे आणि गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे वैज्ञानिक मंडळी त्यातील निष्कर्षांचा आढावा घेत आहेत. निसर्गाचा गळा घोटत केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, मानवी सुविधांसाठी पर्यावरणाला नख लावण्याच्या धोरणांचा पुनर्विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण मुंबईच्या अंगणात पसरलेल्या सागराचा प्राण तळमळला तर चोरपावलांनी मुंबईला तो कवेत घेण्याचा धोका नाकारता येत नाही.