Breaking News

शतप्रतीशत भाजपचा अजेंडा राबविण्यासाठी जनतेचा बळी ः चव्हाण

नाशिक, दि. 25 - उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या विधानसभा निवडणूकी दरम्यान  कश ट्रान्झक्शन सहजसुलभ व्हावं  म्हणून नोटबंदी आणि महाराष्ट्रातील महापालिका,जिल्हा परिषदेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून शिवस्मारकाचे गाजर दाखविणार्या भाजपच्या मुखियांनी जनतेला खुलासा द्यावा असे आव्हान माजी मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत विश्‍वअचंबित शिवस्मारकाच्या जलभुमी पुजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना माजी मुख्यमंञी चव्हाण आणि माजी महसूल मंञी आ.बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये भाजप सरकारच्या कथित सर्जिकल स्ट्राईक शैलीची शस्रक्रीया करीत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी फडणवीस सरकारच्या एकूण धोरणांवर टीका करतांना राजकारण आणि पक्षीय स्वार्थ हाच त्यांचा अजेंडा असल्याचे सांगून हा अजेंडा राबवितांना सर्वसामान्य जनतेचा बळी देण्याचे पाप त्यांनी केले,काळे धनाचे निर्मुलन,दहशतवादाचा नायनाट आणि भ्रष्टाचाराचे निर्मुलन  हे तीन उद्दिष्ट निश्‍चलीकरण निर्णयाच्या मागे आहे,असा डांगोरा पिटला जात असला तरी यापैकी कुठलेच उद्दिष्ट  एक टक्काही पुर्णत्वास नेता आला नाही सीमेपलीकडून दहशतवादी हल्ले सुरूच आहेत.
नवीन नोटा पाकीस्तानात छापल्या जाणारच नाहीत याची हमी नोटबंदीवाले 56 इंची छाती ताणून देऊ शकत नाहीत.सामान्यांना कळणारे साधे अर्थशास्ञही या विद्वानांना समजले नाही कुठलीही प्राथमिक तयारी न करता जनतेच्या माथी हा निर्णय लादला गेला भ्रष्ट्राचार थांबविण्यात सपशेल अपयश आले.काळे धन नष्ट करण्याच्या बाताही फोल ठरल्या  आश्‍वासनावर विसंबून असलेल्या जनतेला या सरकारने तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला.देशात केवळ सरासरी 6 टक्के काळा पैसा आहे हे अनेक अर्थतज्ञांनी मान्य केले असतांना सरकारचा हा द्रविडी प्राणायाम केवळ पक्षाच्या राजकीय फायद्यासाठीच सुरू आहे,जनतेलाच नव्हे तर केंद्रीय अर्थमंञ्यांसह सर्व केन्द्रीय मंञ्यांनाही त्याची भनक लागू दिली नाही.मंञीमंडळाच्या बैठकीत निर्णय सांगितला केला,केवळ नितीन गडकरी यांनी विचारणा केली माञ त्यांचाही आवाज दाबला गेला.शिवस्मारकासंदर्भात बोलतांना हे स्मारक व्हाव ही काँग्रेसचीच ईच्छा होती.त्या दृष्टीने प्रयत्नही झाले.दुर्दैवाने केंद्र सरकारच्या पर्यावरण धोरणाचा अडसर होता,भाजप सरकारने त्यात बदल करून परवानगीचे सोपस्कार पार पाडले नियोजीत कार्यक्रमानुसार 2015 मध्येच या स्मारकाचे भुमीपुज होणार होते मग दिड वर्ष का रेंगाळले याचे उत्तर सरकारने द्यावे.
या स्मारकाच्या निमित्ताने सरकारच्या पैशावर भाजपचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोट्यावधीचा चुराडा करणार्या जाहीराती केल्या जात आहेत हा सरकारचा म्हणजे जनतेचा कार्यक्रम असताना भाजपने तो हायजक करून शतप्रतीशत भाजपाचा अजेंडा रूजविण्याची हौस भागवून घेतल्याचेही ते म्हणाले.निवडणूकांमध्ये हजारो कोटींचा विनिमय सहजसुलभपणे करता यावा म्हणून रिझर्व्ह बँक आणि अनिल बोकील यांच्या सारख्या अर्थवेत्त्यांनी विरोध केल्यानंतरही तुलनेने कमी दर्शनी किंमतीच्या नोटा रद्द करून दोन हजार रूपये दर्शनी किंमतीची नोट चलनात आणली अशी टीका त्यांनी केली,यावेळी त्यांच्या सोबत आ.बाळासाहेब थोरात, आ.डा,सुधीर तांबे,राजाराम पानगव्हाणे ,माजी मंञी डा.शोभा बच्छाव ,शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर,प्रदेश सरचिटणीस डा.हेमलता पाटील,महिला बालकल्याण समिती सभापती वत्सलाताई खैरे, वंदना मनचंदा,अश्‍विनी बोरस्ते,युवा नेते स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.