Breaking News

नोटबंदी ही देशाची सर्वांगाने मोठी फसवणूक आहे

। नोटबंदी फायदा तोटा व परिणाम विषयावरील चर्चासत्र 

अहमदनगर, दि. 29 - काळा पैसा, भ्रष्टाचार, करचोरी, बनावट नोटा आणि दहशतवाद या विषयांसाठी नोटबंदी केली असे ओरडून सरकार सांगत असतानाच  सरकारने दिलेली आकडेवारी पहाता खोदा पहाड निकला चुहा अशी गत झालेली आहे. सर्वस्तरावर नोटबंदी फसलेली असल्याने आठ नोव्हेंबरच्या भाषणात उलेख  नसलेल्या कॅशलेश, पेटीयम,एटीएम, सारख्या सक्षम नसलेल्या गतिमान नसलेल्या गोष्टी सांगून रोज नव्या नव्या नियमांचे फतवे काढून ठिगळे लावून देशाची  केलेली फसवणूक लपवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा सूर नोटबंदी फायदा तोटा व परिणाम विषयावरील चर्चासत्रात होता. रहेमत सुलतान फौंडेशन,  जिज्ञासा अकादमी, मखदूम सोसायटी आणि वक्ता मंचाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात निवृत्त आयकर अधिकारी जयंत पारनाईक,कर सल्लागार अ‍ॅड प्रकाश  झावरे,  माणिक अडाणे प्राचार्य शिवाजीराव देवढेे अशा विविध मान्यवरांनी विचार मांडले.