Breaking News

खोदकाम करताना ब्रोकर मशिनला आग ; सन फार्मातील घटना

। आगीत होरपळुन दोघांचा जागीच मृत्यू ; दोन गंभीर जखमी 

अहमदनगर, दि. 29 - एमआयडीसीमधील निंबळक चौकात असलेल्या फार्मातील कंपनीतील एका युनिटमध्ये ठेकेदाराच्या मार्फत लिफट बसविण्याच्या कामासाठी  खड्डा खोदायचे काम सुरु असताना जमिनी खालुन गेलेल्या वायु वाहुन नेणार्‍या पाईपला ब्रोकर मशिनचे घर्शन झाल्याने स्फोट होवून आग लागली. या आगीत  सुभाष अल्हाट व काशिनाथ साळवे हे दोघे कामगार होरपळुन जागीच मरण पावले. तर बद्रीनाथ कुमार व आबाशी बेहरा हे दोन परप्रांतीय कर्मचारी गंभीर जमखी  झाले. ही घटना बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मयताचे मृतदेह शवविच्छेनासाठी शासकीय  रुग्णालयात पाठविण्यात आले.
सनफार्मा कंपनीत स्फोट झाल्याची माहिती सर्वत्र समजल्याने कंपनीतीन कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी समोर एकच गर्दी केली होती. गर्दी हटविण्यासाठी मोठा  पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
मुंबई येथील बी.बी.सांजगीरी या ठेकेदारामार्फत कंपनीत सिव्हील काम सुर होते. पोलिसांनी माहिती घेवुन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली  होती. दरम्यान, या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच सपोनी राहुल पाटील, उपअधिक्षक भोईटे, घटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान,  मयतांचे नातेवाईक कंपनीत आले. त्यांनी कंपनीच्या मॅनेजरला वेठीस धरले. त्यानंतर माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, सचिन जाधव, विक्रम राठोड,  दिलीप सातपुते यांनी घटनेची माहिती घेवुन कंपनीच्या व्यवस्थापकाशी सविस्तर चर्चा केली.