Breaking News

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी 14 वर्षांखालील क्रिकेटचा संघ रवाना

। आमदार अरुण जगताप यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

अहमदनगर, दि. 23 - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 14 वर्षांखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंधूदुर्ग  जिल्ह्यातील मालवण येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी 140 खेळाडूंमधून 30 जणांची निवड करण्यात  आली. त्यातून आता 14 जणांची या स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला आहे. हा संघ नुकताच स्पर्धेसाठी रवाना झाल्या.
या संघातील खेळाडूंना अ.नगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. माणिक विधाते, गणेश  गोंडाळ, नगरसेवक कैलास गिरवले, रोहित जैन, भरत पवार, कांतीलाल अष्टेकर, ज्ञानेश्‍वर रासकर, प्रा. अरविंद शिंदे, सर्फराज बांगडीवाला, ज्ञानेश्‍वर रासकर,  मार्गदर्शक मीनीनाथ गाडीलकर, आकाश थोरात, संदीप आडोळे आदी उपस्थित होते. नगर जिल्हा क्रिकेट असो.च्या वतीने या खेळाडूंचा खर्च केला जाणार आहे.
आ. जगताप म्हणाले की, क्रिकेट खेळाला प्रोत्साहन मिळावे या असो.च्या माध्यमातून विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. चांगले खेळाडू  निर्माण व्हावेत, यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. चांगल्या प्रशिक्षकांना नगरमध्ये आणून त्यांच्याकडून खेळाडू घडवले जावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत,  असे सांगून 14 वर्षांखालील हा संघ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत निश्‍चित विजय संपादन करील, असा विश्‍वास व्यक्त केला.
संघात निवड झालेेले खेळाडू असे - कर्णधार अश्कान काझी, श्रेयस काकडे, किरण चोरमले, आदित्य खेडकर, वेदांत चिट्याल, सुजल घारू, अब्दुल  रहेमान सय्यद, निखील पवार, साईश गोंडाळ, आर्या गुंडू, ऋषभ हिरम, प्रणव कांबळे, अरबाज शेख, पियुष अष्टेकर, अवधूत कुलकर्णी.