फ्लिपकार्टच्या ऑनलाईन खरेदीत दिल्लीकर अव्वल
नवी दिल्ली, दि. 26 - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून सर्वाधिक खरेदी दिल्लीकरांनी केली आहे. दिल्ली राजधानी क्षेत्रातील ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीसाठी फ्लिपकार्टला अधिक पसंती दिली असून त्या खालोखाल बंगळुरू, मुंबई, चेन्नई व हैदराबाद शहरांमधील ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून सर्वाधिक खरेदी केली आहे. 2016 वर्षात फ्लिपकार्टच्या माध्यमातून पुरूषांनी 60 टक्क्यांची खरेदी केली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक साधने, वैयक्तिक रेडिओ, चपला व चैनीच्या वस्तूंची खरेदी अधिक प्रमाणात केली. फ्लिपकार्टने 2016मधील खरेदी-विक्रीबाबतची माहिती देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे.