रिलायन्स जिओच्या मोफत सेवेविरूद्ध एअरटेलची दूरसंचार न्यायाधिकरणात धाव
नवी दिल्ली, दि. 26 - रिलायन्स जिओच्या नव्या मोफत सेवेला दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंजुरी दिल्याच्या निर्णयाविरोधात भारती एअरटेलने दूरसंचार न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. दूरसंचार प्रधिकरणाच्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्या मोफत सेवा केवळ 90 दिवसांसाठी देऊ शकतात. मात्र रिलायन्स जिओकडून नियमांचे उल्लंघन होत असतानाही ट्राय केवळ बघ्याची प्रेक्षकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप भारती एअरटेलने केला आहे.
नियमांनुसार रिलायन्स जिओने मोफत सेवा सुरू न ठेवण्याचे निर्देश ट्रायने कंपनीला द्यावे, अशी मागणी भारती एअरटेलने न्यायाधिकरणाकडे दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. मार्च 2016 पासून कंपनीने ट्रायच्या दर पत्रकाचे उल्लंघन केले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. रिलायन्स जिओच्या मोफत कॉलिंग सेवेमुळे नेटवर्कवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा आरोप एअरटेलने केला आहे.
जिओने 4 सप्टेंबर रोजी आपल्या सेवेची सुरूवात केली होती. दरम्यान 31 डिसेंबर पर्यंत ग्राहकांना मोफत सेवा देण्याची घोषणा केली होती. मात्र या कालावधीत वाढ करून मोफत सेवा 31 मार्चपर्यंत देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. संपूर्ण प्रकरणात नियमांचे उल्लंघन होत असतानाही ट्रायने कारवाईचे कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे दूरसंचार न्यायाधिकरणात याचिका दाखल करावी लागल्याचे एअरटेलकडून सांगण्यात आले. पुढील दहा दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी ट्रायने नमूद केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार असून ट्रायने यावेळी आपला निर्णय न्यायाधिकरणापुढे मांडावा आणि जिओनेही आपली याचिका दाखल करावी, असे आदेश न्यायाधिकरणाकडून देण्यात आले.