ग्रीसचे राजदूत अमरीदीस यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक
ब्रासीलिया, दि. 31 - ब्राझीलमध्ये ग्रीसचे राजदूत किरिआकोस अमरीदीस यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीला रिओ डी जानेरो पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अन्य तीन जणांनादेखील अटक करण्यात आली आहे.
अमरीदीस हे सोमवारपासून बेपत्ता होते आणि गुरूवारी एका जळालेल्या गाडीत त्यांचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. अमरीदीस यांच्या पत्नीचे एका पोलीस अधिका-याशी प्रेमसंबंध होते आणि त्याच कारणामुळे त्यांनी कट रचून त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 2016 मध्ये अमरीदीस हे ब्राझीलमध्ये राजदूत म्हणून आले होते. यापूर्वी 2001 ते 2004 दरम्यान ते ग्रीस दुतावासात कार्यरत होते.
बुधवारी अमरीदीस यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने स्थानिक पोलीस ठाण्यात केली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांचा मृतदेह आणि गाडी एका उड्डाणपुलाखाली जळलेल्या अवस्थेत आढळली. अमरीदीस आणि त्यांची पत्नी ज्या ठिकाणी थांबले होते, त्याठिकाणी असलेल्या सोफ्यावरही रक्ताचे डाग आढल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमरीदीस यांची घरात हत्या करण्यात आली असून नंतर त्यांचा मृतदेहासह गाडीला आग लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.