नाईटक्लब, बारमध्येही दाखवणार पंतप्रधानांचे भाषण
नवी दिल्ली, दि. 31 - नोटा रद्दच्या निर्णयानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 7.30 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण नाईटक्लब आणि बारमध्येही दाखवण्याचा निर्णय काही बार व्यवस्थापकांनी घेतला आहे. नाईटक्लब आणि बारचे व्यवस्थापक या भाषणासाठी खास मोठे स्क्रीन लावणार आहेत.
‘नोटा रद्दनंतर आज मोदी कोणत्या महत्वाच्या विषयांवर भाष्य करतात? कोणता नवा निर्णय जाहीर करतात? याची सा-यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे भाषण आम्ही मोठ्या पडद्यावर दाखवणार आहोत’, असे कॅफे-बारच्या व्यवस्थापकाने सांगितले.