केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आयओएचं तात्पुरतं निलंबन
मंगळवारी आयओएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कलमाडी आणि चौटाला यांची आयओएच्या मानद आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. कलमाडी यांना 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती. तर चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
त्यामुळे बरीच टीका होऊ लागल्यावर कलमाडींनी आपण हे पद नाकारत असल्याचं आयओएला कळवलं होतं. दरम्यान आयओएने कोणतंच पाऊल उचललं नसल्याने क्रीडा मंत्रालयाने आयओएची संलग्नता रद्द केली आहे.