ग्राहकांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमीच तत्पर ः राठोड
अहमदनगर, दि. 27 - भारतीय घटनेने 24 डिसेंबर 1986 साली ग्राहकांसाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पारित करुन एक क्रांतीकारक पाऊल उचलले. परंतु अजूनही सर्वसामान्य ग्राहक आपल्या हक्काबाबत आणि कायद्यांबाबत अनाभिज्ञ आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आता ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचे काम करेल. शिवसेनेच्यावतीने नेहमीच ग्राहकांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे. जेथे फसवणुक होते, तेथे शिवसैनिकानी आपल्या स्टाईलने आंदोलन करुन ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने ‘जागरुक ग्राहक-काळाची गरज’ या माहिती पत्रकाचे वितरण शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संदिप कुलकर्णी, गणेश कुलथे, रमेश खेडकर, नितीन चंगेडिया, विजय पाठक, प्रणिल शिंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना राठोड म्हणाले, फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांनी कुठल्याही ठिकाणी खरेदी करताना वस्तूची योगता पाहूनच खरेदी करावी. जर फसवणुक झाल्याने लक्षात आल्यास त्यांनी ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यालय प्रमुखपदी गणेश कुलथे, उपजिल्हा कक्षप्रमुख संदिप कुलकर्णी, नगर तालुका कक्षप्रमुख रमेश खेडकर, कार्य.सदस्यपदी नितीन चंगेडिया आदिंची निवड करण्यात आली. उपनेते राठोड यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.गणेश कुलथे यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची माहिती दिली. तर संदिप कुलकर्णी यांनी नगर शहरातील नागरिकांनी सतर्क राहवे, असे सांगून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. यावेळी सतीश चोपडा, महेश बीडकर, अप्पा भोसले, विजय पाठक, प्रणिल शिंदे, तसेच ग्राहक व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.