Breaking News

रेणावीकर माध्यमिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ

अहमदनगर, दि. 23 - म.ए.सो. रेणावीकर माध्यमिक विद्यालयात क्रीडा मेळाव्याचा प्रारंभ टेबल टेनिस प्रशिक्षक किरण पवार व योग विद्या धामचे योग शिक्षक  माणिकराव अडाणे यांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योतीचे स्वागत करून संपन्न झाला. याप्रसंगी सौ. अंजली कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. अंजना गायकवाड, सौ. मंजुषा  कुलकर्णी, क्रीडा अध्यापक राजेश भालसिंग, क्रीडा शिक्षक महादेव मगर आदी उपस्थित होते.
यावेळी किरण पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण आत्मविश्‍वास असायला हवा. पावसात सर्व पक्षी आपल्या घरट्यात जातात. पण गरुड पक्षी संकटाला न  डगमगता आकाशात विहार करतो. त्या गरुड पक्षाप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी आकाशात भरारी घेऊन यशाचे शिखर गाठावे. नकारात्मक विचारांना तुम्ही आयुष्यात  थारा देऊ नका व कायम सकारात्मक रहा. शिक्षक, पालक व विद्यार्थी हा त्रिकोण चांगला साधला गेला, तर प्रगती निश्‍चितच होईल. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी  प्राणायाम व योग महत्वाचा आहे.
विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळ व्यायाम करून शारीरिक विकास घडवून आणावा, असे योग शिक्षक माणिकराव अडाणे यांनी सांगितले. मुख्याध्यापिका सौ. अंजना  गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहल उपाध्ये यांनी केले. स्वागत गीत सौ. शुभांगी देशपांडे व विद्यार्थ्यांनी  सादर केले. आभार सौ. जयश्री गांधलीकर यांनी मानले.