प्रथमदर्शी साक्षीदार फि र्यादिची उलटतपासणी पुर्ण
। आज डॉक्टर व वर्गशिक्षकाची महत्त्वपुर्ण साक्ष नोंदविली जाणार
अहमदनगर, दि. 23 - संपूर्ण राज्याला हादारुन सोडणार्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व निर्घन खुन खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले यांच्या समोर मंगळवार पासून सुरु झाली. मंगहवारी तिन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या बुधवारी खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फि र्यादी व पिडीत मुलीचा मावसभाऊ यांची महत्वपुर्ण साक्ष नोंदविण्यात आली. ती अपुर्ण रहिल्याने गुरुवारी साक्ष पुर्ण करण्यात आली. घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेल्या वस्तुंपैकी पिडीत मुलीची सायकल तसेच मुख्य आरोपी पप्पू शिंदे याची मोटारसायकल याची ही साक्षीदाराने ओळखली.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी फि र्यादीची सत्त पुर्ण केल्यानंतर खटल्यातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याचे वकील योहान मकासरे यांनी फि र्यादीची उलट तपासणी सुरु केली. उलट तपासणीत फिर्यादीतील अनेक प्रश्नांच भडिमार केला. यात अॅड.मकासरे साक्ष नोंदविताना म्हणाले की, घटनेची जागा व जप्त वस्तु तसेच पोलिसांनी फिर्यात लिहून घेतली की टाईप करुन घेतली. दुचाकी कोणत्या कंपनीची होती. तिचा नंबर काय, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर फि र्याद दिली का, खोटी साक्ष देत आहात का अशी विचारणा केली. उलट तपसणीत उत्तरे देताना फि र्यादी गांगरुन गेला. फिर्यादीने, फिर्यादित न आलेल्या मुद्यांबाबत स्पष्ट कबुली दिली. तसेच खोटी साक्ष देत नसल्याचेही स्पष्ट केले.
न्यायालयात फिर्यादिची उलट तपासणी पुर्ण झाल्यानंतर खटल्यातील इतर दोन आरोपींच्या वकिलांना उलट तपासणी घ्यावयाची की अशी विचारणा केली असता त्यांनी उलट तपासणी घेणार नाही असे न्यायालयासमोर स्पष्ट केले.शुक्रवारी सकाळी न्यायलायासमोर खटल्यातील मुख्य साक्षीदार व कुळधरणचे डॉक्टर व पिडीत मुलीचे वर्गशिक्षक या दोघांच्या महत्त्वपुर्ण साक्षी नोंदविल्या जाणार आहेत. त्यानंतर आरोपींचे वकील अॅड.मकासरे, अॅड.चोपडे व अॅड.आहेर दोघांची उलट तपासणी घेणार आहेत.
पोलिसांनी घटना स्थळावरुन जप्त केलेल्या वस्तुपैकी सायकल व मोटरसायकल न्यायालयात आनल्यानंतर खटल्याचे मुख्य कामकाजास सुरवात करण्यात आली.