अखिलेश यांच्या बैठकीला 198 आमदार उपस्थित
लखनऊ, दि. 31 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब विखुरलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि चुलत भाऊ रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. मात्र यानंतर उत्तर प्रदेशात आज हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. पण मुख्यमंत्री अखिलेश यादव मुलायम यांच्यावर भारी पडल्याचं चित्र आहे. कारण अखिलेश यांच्या बैठकीत 198 आमदार आणि 25 मंत्री उपस्थित असल्याची माहिती आहे. तर मुलायम यांच्या बैठकीत आतापर्यंत केवळ 11 आमदार आणि 67 उमेदवार दाखल झाले आहेत. दरम्यान, या बैठकीत अखिलेश यादव यांना अश्रू अनावर झाले. मी वडिलांपासून वेगळा झालेलो नाही. उत्तर प्रदेश विधानसभा जिंकून त्यांना भेट देणार, असं अखिलेश म्हणाले.