Breaking News

चहातून होमगार्ड प्रशिक्षणार्थींना विषबाधा

बुलडाणा (प्रतिनिधी) ः येथील जि.टी.सी. केंद्रामध्ये प्रशिक्षण सुरु असलेल्या होमगार्ड्स यांनी परेड झाल्यानंतर मध्याल्या सुटीत चहा पिल्यानंतर त्यांना मळमळ व  उलट्याचा त्रास होवु लागल्याने 60 प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सला आज 29 डिसेंबर रोजी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चिखली रोड वरील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालया अंतर्गत होमगार्ड्सना प्रशिक्षण दिल्या जात आहे. जी.टी.सी. केंद्रावर हे प्रशिक्षण सुरु आहे.
जिल्हाभरातून बुलडाणा शहरात निवासी आलेल्या या होमगार्डसना मेसची व्यवस्था होमगार्ड कार्यालय परिसरातच करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जेवण,  नास्ता, आणि चहा पुरविण्याचे कंत्राट स्थानिक श्रीराम भोजनालय यांना देण्यात आले आहे. दरमयान  आज दुपारचे सत्र संपल्यानंतर सायंकाळी त्यांन चहा  देण्यात आला. यावेळी अनेकांना मळमळ व उलट्या सुरु झाल्या. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच लगेच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी  आणण्यात आले. यातील 60 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली असुन सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.