Breaking News

बॉक्सींग प्रशिक्षणाचा युवतीवर बलात्कार

सांगली, दि. 22 - ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिकणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तासगाव तालुक्यातील कुमठे येथील बॉक्सींग  प्रशिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी बलात्कार झाल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हंटले आहे.  यातील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह बालगैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
अजय पाटील (25, रा. कुमठे, ता. तासगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अजय पाटील याचा कुमठे येथे बॉक्सिंग क्लब आहे. तसेच  विविध स्पर्धांमध्ये तो पंच म्हणून काम पाहतो. पीडित मुलगी ही गेल्या चार वर्षांपासून त्याच्याकडे बॉक्सिंग खेळाचा सराव करीत आहे. सांगलीच्या क्रीडा संकुलात  झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेवेळी या दोघांची ओळख झाली. या ओळखीनंतर हे दोघेही मोबाईलवर एकमेकांशी बोलत होते. दोन वर्षापूर्वी अजयने या पीडित मुलीस  लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर इस्लामपूर व सांगली येथे अजयने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, अजयने सहा महिन्यांपूर्वी दुसर्‍याच मुलीशी लग्न केले आहे. त्यामुळे अजयकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित मुलीन तासगाव पोलिसांत  याबाबतची फिर्याद दिली. हा गुन्हा अधिक तपासासाठी इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक जीवन राजगुरु अधिक तपास करीत  आहेत.