गुंडागर्दी - गुन्हेगारी याच मातीत गाडू
सांगली, दि. 22 - आम्हांला कोणाकडून दहा पैसे कमवायचे नाहीत आम्ही कोणी परते नाही तर याच मातीतले आहोत. जिल्ह्यातली गुंडागर्दी - गुन्हेगारी याच मातीत गाडली जाईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे - पाटील यांनी दिला. मिरज शहर पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी ते येथे आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, गुन्ह्यांचा तपास जलदगतीने आणि गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर वरिष्ठांचे स्वतंत्रपणे निरिक्षक असेल. गुन्हेगारांना तडीपार करण्यात येईल. कामकाजात पारदर्शकता आणण्यावर विशेष लक्ष दिले आहे. जप्त केलेली आणि पोलिस ठाण्यांच्या आवारात सडत पडलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठीही विशेष मोहीम राबवली जाईल. वाहतूक सुधारणांसाठी प्रत्येक शहराचा आराखडा विशेष तज्ज्ञांकरवी केला आहे. रस्ते अपघात हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे. ते रोखण्यासाठी पोलिस आपली जबाबदारी पार पाडतील. व्यापक जगप्रबोधनाची मोहीम सुरु होईल. जिल्ह्यात मटका, दारु, बेकायदा दारु, वेश्या व्यवसायासह, वाळू माफीयांवरही कठोर कारवाई होईल. त्यासाठी गुन्हेगारांच्या कुंडल्या बनवण्याचे काम प्रत्येक ठाण्यात सुरु आहे. मातीत गुन्हेगारांना थारा नाही. त्यांना याच मातीत गाडले जाईल. ते म्हणाले, मिरजेतील सराफ कट्टा परिसरात झालेल्या चोर्यांचे तपास झालेले नाहीत. त्यांचा नव्याने तपास होईल. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय त्याचा आढावा घेतील.
ज्या गुन्ह्यांचा तपास होऊन ही गुन्हेगारांना अभय देणार्या चुका झाल्या असतील तर कुणाचीही गय केली जाणार नाही. मिरजेतील खून, दरोडे आणि जबरी चोर्यांसारखे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र घरफोड्यांचा तपास समाधानकारक नाही. हे प्रमाण मात्र केवळ साडेतीन टक्के आहे. याबाबत अधिकार्यांना खुलासा द्यायला सांगितले आहे. मिरज शहराच्या तोंडावरच वेश्यावस्तीचे स्थलांतर करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबवला जाईल.