वेश्या अड्ड्यावर छापा, पळून जाताना तरुणाचा मृत्यू
नागपूर, दि. 23 - देहविक्री सुरु असल्याची टिप मिळाल्यानंतर, पोलिसांनी धाड टाकली मात्र त्यानंतर धक्कादायक घटना घडली. पोलिसांना चुकवून पळून जाण्याच्या नादात, तिसर्या मजल्यावरुन कोसळून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
नरेंद्रनगर परिसरात बालपांडे लेआऊटच्या उच्चभ्रू इमारतीत देहविक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हें शाखेच्या पथकाने संबंधित इमारतीवर छापेमारी केली. त्यावेळी त्याठिकाणी 2 महिला आणि 2 पुरुष उपस्थित होते. मात्र त्यापैकी एका तरुणाने अटक होण्याच्या भीतीने तिथून पळ काढला. मात्र पळताना तिसर्या मजल्याच्या बाल्कनीमधून शेजारच्या इमारतीच्या बाल्कनीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसल्याने तो थेट खाली कोसळला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला.