स्पर्धेच्या युगात फार्मसी क्षेत्राला महत्त्व : डॉ. जॉन डिसुझा
कराड, दि. 22 (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धेच्या युगात फार्मसी क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनवीन बदलामुळे या क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडत आहे, असे प्रतिपादन तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज वारणानगरचे प्राचार्य डॉ. जॉन डिसुझा यांनी केले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी फार्मसी क्षेत्र विस्तारीत करण्यासाठी असणार्या विविध संधी सांगितल्या व मार्गदर्शन केले. आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डी. डी. चौगुले यांनी बदलत्या काळातला फार्मासिस्ट मानवतावादी असावा, असे सांगितले. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी औषध निर्माण शास्त्राचे महत्त्व सांगून स्पर्धेत सहभागी झालेली महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक-गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, लिंंब, सातारा, द्वितीय क्रमांक-अनिल उर्फ पिंटू मगदुम मेमोरीयल ऑफ फार्मसी धरणगुत्ती, ता. शिरोळ, तृतीय क्रमांक - कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कॉलेज ऑफ फार्मसी (डि. फार्मसी) कराड, व श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डि. फार्मसी), घोगांव, ता. कराड यांनी मिळवला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सीईओ प्रदिप कबाडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली महाडिक, प्राचार्य डॉ. जॉन डिसुझा, प्राचार्य डी. डी. चौगुले, कृष्णा चॅरिटेबल डि. फार्मसीच्या प्राचार्या शुभांगी पाटील, गौरीशंकर डि. फार्मसीच्या प्राचार्या नयना पिंपोडकर यांची प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालक सागर पाटील, सीईओ प्रदीप कबाडे, प्राचार्या सौ. वैशाली महाडीक, सर्व शाखांचे प्राचार्य, डि. फार्मसीचे संस्थेचे पदाधिकारी, कार्यालयीन अधिक्षक तानाजी शेवाळे, शिक्षक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संतकृपा संस्थेचे प्राचार्या डॉ. प्रज्ञा पाटील, प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, प्राचार्या यास्मीन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्या शुभांगी पाटील व नयना पिंपोडकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिल सर्वगोड, श्रृती बडेकर, रोहीणी ताटे, कोमल पाटील या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी रोहीणी ताटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.