Breaking News

सोलापूर-हैद्राबाद मार्गावर दोन बसची धडक, पाच प्रवाशांचा मृत्यू

उस्मानाबाद, दि. 23 - दोन बसच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-हैदराबाद मार्गावर उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातल्या येणेगूरजवळ हा अपघात झाला.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या उमरगा-पुणे आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसव- कल्याण या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही  गाड्यांचे ड्रायव्हर मृत्युमुखी पडले आहेत. या भीषण अपघातानं मुंबई-हैदराबाद महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. जखमी असलेल्या 20  जणांपैकी 8 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.